पत्र, अर्ज हे जवळपास आपल्या रोजच्या वापरातले शब्द ज्यांना आपण आज मेल, अप्लिकेशन ई. शब्द वापरत असतो. शब्द काहीही वापरत असलो तरी ते विद्यार्थ्यांना किंवा कार्यालयीन कामकाजाकरीता फार उपयूक्त असा तो भाग आहे.
जसे बऱ्याचदा आपल्याला एखादि व्यक्ती किंवा एखादी संस्था आणि सरकारी कार्यालयात तर बरेचदा प्रत्यक्षच अर्ज करावा लागतो. त्यामुळे आपण अर्ज कुणाला करीत अहो आणि तो कश्या पद्धतीने करायचा आहे (How to write Application Letter) हे जाणून घेऊयात.
सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊ कि अर्जामध्ये अश्या गोष्टीचा, मायन्याचा समावेश असला पाहिजे कि त्यामुळे कमी शब्दात समोरच्या व्यक्तीला तुम्हाला अर्जातून काय सांगायचे आहे किवा अपेक्षित आहे हे चट्कन कळायला हवे.
या व अश्याच काही अर्जातील महत्वाच्या घटकांवर आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.
प्रमुख मुद्दे –
1. अर्जाच्या बाबतीत संक्षिप्त स्वरूपातील महत्वाचे मुद्दे-
2. चांगल्यात चांगल्या पद्धतीने अर्ज कसा करू शकतो –
3. वेगवेळ्या उद्देशांसाठी केलेल्या अर्जांचे काही उदाहरण –
या मूळ गोष्टींवरून आपल्या लक्षात आले असेलच कि अर्ज लिहितांना कोणत्या मुद्द्यांवर आपलं लक्ष असलं पाहिजे. तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊया काही महत्वाचे मुद्दे.
आतापर्यंत आपण महत्वपूर्ण बाबींकडे पाहिले आता आपण काही अर्जांचे उदाहरण पाहूयात त्यावरून आपण अर्ज कश्या पद्धतीने करावा ह्या गोष्टी स्पष्ट होतील.
1 – बँकेकडून नवीन पासबूक मिळावे त्यासाठी केलेला अर्ज.
२ – शाळेतील शिक्षक या पदासाठी केलेला अर्ज
प्रती,
शाखा व्यवस्थापक,
स्टेट बँक ऑफ इंडिया
कर्वे चौक, बापट मार्ग पुणे.
सर,
आपणास विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो मी श्री.मयूर पाटील गेल्या ५वर्षांपासून तुमच्या बँकेच्या शाखेचा ग्राहक आहे, माझा खाते क्रमांक —————– आहे. गेल्या आठवड्यात काही वैयक्तिक कारणामुळे माझे पासबुक प्रवासात हरवले आहे, ज्याची तक्रार मी जवळच्या पोलीस ठाण्यात केली आहे. पण भविष्यात मला आर्थिक व्यवहारांची अडचण येऊ नये त्याकरिता पासबुकची गरज भासणार आहे तरी मला मला नवीन पासबुक देण्यात यावे हि विनंती. यासाठी मी अर्जासोबत जुन्या पासबूकची तसेच पोलीस स्टेशनच्या तक्रारिची दुय्यम प्रत सोबत जोडत आहे. मला खात्री आहे की येत्या काही दिवसांत माझ्या अर्जावर विचार केल्यानंतर, तुमच्या बँकेच्या शाखेतून मला लवकरच एक नवीन पासबुक उपलब्ध करून दिले जाईल.
तुमचा विश्वासू ग्राहक,
मयूर पाटील
स्वाक्षरी: ————
खाते क्रमांक: ——-
मोबाईल नंबर:——
दिनांक:
प्रती,
प्राचार्य
श्री. छत्रपती शिवाजी विज्ञान, वाणिज्य व कला महाविद्यालय,
अकोट रोड, अकोला.
विषय- मराठी विषय शिक्षक पदासाठी अर्ज.
अर्जदार – आशिष रामचंद्र माने
मी खालील सही करणार आशिष माने विनंती पूर्वक अर्ज सदर करतो कि, तुमच्या शाळेत मराठी विषयासाठी आवश्यक शिक्षक पदासाठी वर्तमानपत्रातील जाहिरात वाचली आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मी मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षणासोबतच माझे शिक्षण पूर्ण केले आहे. आणि गेली ५ वर्षे मी मराठी शिक्षक म्हणून काम करत आहे. म्हणूनच मला तुमच्या शाळेत मराठी विषयासाठी शिक्षक म्हणून काम करायला आवडेल. मी तुम्हाला या अर्जाद्वारे नम्रपणे विनंती करतो की मला सेवेची संधी द्यावी जेणेकरून मी तुम्हाला मराठी या विषयासंबधीत काहीतरी करून दाखवू शकेन. मी या अर्जासोबत माझे ओळखपत्र जोडत आहे, मुलाखतीच्या वेळी मूळ कागदपत्रे तुमच्यासमोर सादर केली जातील. मला पूर्ण खात्री आहे की माझ्या या अर्जाचा तुमच्या बाजूने पूर्ण विचार केला जाईल आणि मला याबाबत लवकरच कळवले जाईल.
आपला नम्र
आशिष रामचंद्र माने
सही
दिनांक
मो. नं. .—————-
आदर्श कॉलनी, अकोला.
टीप: उदाहरणामध्ये दिलेले ठिकाण, व्यक्तीचे नाव आणि कंपनी किंवा संस्थेची माहिती हे फक्त एक उदाहरण आहे, ज्याचा कोणत्याही खऱ्या गोष्टीशी संबंध नाही, जर कोणत्याही परिस्थितीत असे साम्य आढळले तर तो केवळ योगायोग समजला जाईल.
अशा प्रकारे तुम्ही अर्जाच्या संपूर्ण पद्धतीसह याची काही उदाहरणे वाचलीत आम्हाला खात्री आहे की तुम्हाला दिलेली माहिती समजली असेलच. इतर विषयांशी संबंधित माहिती वाचण्यासाठी आमचे विविध विषयांवर केलेले लेख नक्की वाचा आणि ही महत्वाची माहिती सर्वांसोबत शेअर करा. तर जुळून रहा माझी मराठी सोबत धन्यवाद.
उत्तर: दोन प्रकारचे अर्ज आहेत, जे औपचारिक आणि अनौपचारिक अर्ज असतात.
प्र. २. नोकरीच्या अर्जात शिक्षणाशी संबंधित उल्लेख करणे आवश्यक आहे का?उत्तरः तसे संबधित जाहिरातीत नमूद केले असेल तर माहिती द्यावी.
प्र. ३. ग्राहक म्हणून, मला कोणत्याही बँकेत अर्ज करायचा असल्यास, मला कोणाकडे अर्ज करावा लागेल?उत्तरः बँकेच्या शाखा व्यवस्थापकास
प्र. ४. तुम्हाला कोणत्याही महाविद्यालयात नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर असा अर्ज कोणाकडे करावा लागेल?उत्तर: महाविद्यालयाचे प्राचार्य.
प्र. ५. जर मला कामाच्या ठिकाणी रजेसाठी अर्ज करायचा असेल, तर ईमेलद्वारे अर्ज करू शकतो का?उत्तर: करू शकता पण, तुमच्या कार्यालयाच्या नियमांवर ते अवलंबून आहे.